राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. अफजलखान आणि शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत, असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं होतं. त्याविरोधात भाजपाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. अशातच जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास १० लाखांच्या बक्षीसाची वादग्रस्त घोषणा करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जालन्यात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा ओबीसी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी म्हटलं की, “महाराष्ट्रातील जनतेला आवाहन आहे की, जितेंद्र आव्हाड दिसतील, तिथे त्यांची जीभ छाटावी. जो जीभ छाटेल १० लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल,” अशी घोषणा कपिल दहेकर यांनी केली.

हेही वाचा : मुलीच्या नावाचं ट्विटरवर ‘फेक अकाऊंट’, बाळासाहेब थोरात म्हणाले, “माझी कन्या शरयू…”

मुंबईत भाजपा-राष्ट्रवादी कार्यकर्ते आमने-सामने

भाजपा युवा मोर्चाने जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. पण, पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना रोखत ताब्यात घेतलं. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर भाजपाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

महाराष्ट्र सन्मान परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडेंनी विधानसभेत सांगितलं की, आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हटलं की, मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शायिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे.”

हेही वाचा : “मी नखाला नख घासलं, पण माझे केस…”, अजित पवारांनी रामदेव बाबांचा किस्सा सांगताच सभेत हशा पिकला

“१६६९ साली दुष्काळ होता. तेव्हा आपल्या तिजोरीचे टाळे उघडून शेतकऱ्यांमध्ये पैसे जाऊद्या, हे सांगणारे जगातील पहिले राजे शिवाजी महाराज होते,” असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 lakh reward cutting jitendra awhad tongue bjp obc morcha leader kapil dahekar in jalna ssa