नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात आज भरदुपारी एका वकिलाने दुसऱ्या वकिलावर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि वार करण्यात आले त्या वकिलचा मृत्यू झाला आहे. तर ज्याने हल्ला केला त्या वकिलाने विष पिऊन आत्महत्या केली आहे अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे नागपूर शहर हादलले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुपारी चार ते साडेचारच्या सुमारास नॅशनल महाविद्यालयासमोर असलेल्या फुटपाथववर अॅड. सदानंद नारनवरे या ६२ वर्षीय वकिलावर वकील लोकेश मुकेश भास्करने कुऱ्हाडीने हल्ला करून वार केले. लोकेश भास्करने न्यायालयात येताना सोबत कुऱ्हाड बाळगली होती. सदानंद नारनवरे न्यायालयातून बाहेर पडल्यावर लोकेश भास्करने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्यावर कुऱ्हाडीचे वार केले. नारनवरे यांच्या मानेवर वार झाल्याने जागीच कोसळले. त्यांना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. न्यूज १८ लोकमतने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

नारनवरे यांच्यावर हल्ला केल्यानंतर तिथे हजर असलेल्या नागरिकांनी आणि पोलिसांनी लोकेश भास्करला पकडलं होतं. मात्र तेवढ्यात त्याने स्वतःजवळ असलेले विष प्राशन केले. ज्यानंतर पोलिसांनी लोकेशला रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयात उपचार घेत असताना त्याचाही मृत्यू झाला. आरोपी मुकेश भास्कर हा मूळचा भंडारा येथील रहिवासी होता. त्याने नारनवरे यांच्यावर हल्ला का केला आणि त्यानंतर स्वतः विष पिऊन आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

 

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advocate murdered another lawyer with axe in nagpur