राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात होणाऱ्या अश्लील लावणी नृत्य कार्यक्रमांवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत वेळ पडली तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडू, असा इशारा दिला. यावेळी त्यांनी असे अश्लील नृत्याचे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आयोजित होत असतील त्यांनाही सूचना दिल्या जातील, असंही त्यांनी नमूद केलं. ते बुधवारी (८ फेब्रुवारी) माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारं आहे. महाराष्ट्राची लावणीची एक परंपरा आहे. आपल्या इथं चालणारे लावणीचे कार्यक्रम सर्वांना पाहता येतील असे झाले पाहिजे. त्यात अश्लील प्रकार व्हायला नको. दुर्दैवाने काही जिल्ह्यांमध्ये अशा कार्यक्रमांना बंदी आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ते चालू आहे. नक्की वस्तूस्थिती काय आहे याबाबत मी संबंधितांशी बोलणार आहे. तसेच वेळ पडली तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय मांडू.”

“अश्लील नृत्याचा विषय मी अर्थसंकल्पात मांडेन”

“महाराष्ट्राची एक उच्च परंपरा आहे. पहिल्यापासून आपल्या वडिलधाऱ्यांनी एक परंपरा निर्माण केली आहे. ती परंपरा टिकली पाहिजे. त्यामुळे कोणी चुकीचं वागत असेल, तर त्याला पायबंद घातला पाहिजे, अशी माझी आग्रही भूमिका आहे. तो विषय मी अर्थसंकल्पात मांडेन,” असं मत अजित पवारांनी मांडलं.

हेही वाचा : “दादा, मी राजीनामा दिलेला आहे, तो माझा…”,अजित पवारांनी दिली बाळासाहेब थोरातांच्या फोनची माहिती

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी अश्लील नृत्य कार्यक्रम आयोजित करू नये”

“अनेकदा असे कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमात पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा फलक असतो. हे आम्हाला अजिबात मान्य नाही. अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम करता कामा नये. तशा सूचना राष्ट्रवादी पक्षांच्या सर्व जिल्ह्यांच्या अध्यक्षांना देणार आहोत,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar comment on obscene dance program in maharashtra on ncp stage by party worker pbs
First published on: 08-02-2023 at 12:39 IST