दापोली: मंडणगड तालुक्यातील देव्हारे या मुख्य गावापासून वडवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी भर दिवसा दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे.वनविभागाच्या दृष्टीने देव्हारे पंचक्रोशीचा परिसर हा घनदाट व बिबट्यांचे अधिवास असल्याने सुरक्षित मानला गेला आहे. गतवर्षी वनविभागाने याच परिसरातून एका बिबट्यास पिंजऱ्यात पकडून त्याची वैद्यकीय तपासणी करुन त्यास सुरक्षित अधिवासात सोडले होते. अनेक वर्षांपासून  वन्यजीवांची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 त्याकडे वनविभागाने दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे तालुक्यातील बिबट्यांची संख्या कोणालाही माहीत नाही. मात्र वाघाच्या प्रजातीत ठिपक्यांच्या वाघाचा तालुक्यातील वेळास ते देव्हारे परिसरात सर्वाधिक वावर दिसून आला आहे. या भागातील खाजगी क्षेत्रातील जमीन मालकीत मोठ्या प्रमाणावर 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free movement of leopards throughout the day at mandangad devare amy