गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या राज्यात यंदा २७ टक्के जास्त पाऊस अपेक्षित असून कोकण विभागात सरासरीपेक्षा २७.५ टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदा पावसाची लक्षणे लवकर दिसू लागली असून १ जुनपर्यंत कोकणात मान्सून दाखल होईल व ७ ते १५ जुनपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होईल. प्राथमिक पुर्वानुमानानुसार प्रादेशिक हवामान खात्याचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ही माहिती दिली. यंदा जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात पावसाचा जोर राहणार आहे. त्यामुळे कोकणातील प्रशासकिय आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी अधिक जागृत राहण्याची गरज आहे.
ठाणे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मान्सून पूर्व तयारीची आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी हवामान खात्याचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी यंदाच्या वर्षीच्या मान्सुनचे हवामान खात्याचे भाकित सांगितले.
मेअखेरीस मान्सून तळकोकणात दाखल होईल, असा अंदाज आहे. भातसा परिसरात वायरलेस यंत्रणा भातसा परिसरात तात्पुरत्या स्वरूपात वायरलेस यंत्रणा बसवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या.
आपत्ती व्यवस्थापन सज्ज ठेवा..
२० ते २५ मेपर्यंत सर्व पालिका आणि नगरपरिषदांनी आपल्या भागातील जीर्ण, मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचे सव्र्हेक्षण पूर्ण करावे तसेच त्या रिकाम्या करण्यांच्या नोटीसा द्याव्यात.आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
संग्रहित लेख, दिनांक 12th May 2016 रोजी प्रकाशित
Rain Prediction: राज्यात यंदा सरासरीच्या २७ टक्के जास्त पावसाची शक्यता
कोकण विभागात सरासरीपेक्षा २७.५ टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता
Written by लोकसत्ता टीम
Updated:

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 12-05-2016 at 13:00 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain prediction in maharashtra