नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ विधान परिषदेच्या सदस्य पदाकरिता डिसेंबर २०२२ मध्ये निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीला आतापासून सुरूवात झाली असून दीड वर्षे अगोदर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांना अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भ शिक्षक संघाची मातोश्री सभागृह येथे रविवार २१ मार्च रोजी बैठक झाली. या बैठकीला माजी आमदार डी.यू.डायगव्हाणे, प्रांत अध्यक्ष श्रावण बरडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, शिक्षक मंडळाचे सदस्य जगदीश जुनगरी यांच्यासह पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व कार्यवाह उपस्थित होते. यावेळी माजी आमदार अ‍ॅड.डायगव्हाने यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाला पूर्वीचे दिवस पून्हा आणण्यासाठी आणि सभागृहात शिक्षकांचा आवाज बुलंद करण्याकरिता आतापासून तयारी करण्याचे निर्देश दिले. दीड वर्षांच्या कालावधीत सहाही जिल्ह्यात संपर्क, समविचारी संघटना, समविचारी पक्षाशी जुळवून घेता आले पाहिजे याकरिता सहकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या उमेदवारीची घोषणा केली. अडबाले यांनी आतापासून तयारी केल्यास कुणीही पराभव करू शकणार नाही असेही ते म्हणाले.

तर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे यांनी सर्वांनी मिळून निवडणूकीत प्रयत्न करावे, ही निवडणूक एक दिलाने लढण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला. सहकार्यवाह अडबाले हे संघर्ष करून शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न आंदोलनाच्या माध्यामातून प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे नेते आहेत. तेव्हा आतापसून सर्वांनी कामाला लागावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी अडबाले यांनी उमेदवारी घोषित केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. सभेचे संचालन चंद्रपूर जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी मानले असे प्रभाकर पारखी यांनी कळविले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur vidarbha madhyamik shikshak sangh nominates sudhakar adbale msr