चंद्रपूरचे नामदेव राऊत यांनी २६ दिवसांत ४ हजार किमोमीटरचा प्रवास पार केला आहे. राऊत यांनी सहा राज्यातून प्रवास करत झाडे लावा, झाडे जगवा, प्रदुषण मुक्त भारताचा संदेश दिला आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेत अतिक्रमण विभागातून सेवानिवृत्त झालेले नामदेव राऊत क्रीडा प्रशिक्षक, स्विमर आहेत त्यांना सायकल चालविण्याचा छंद आहे. स्वच्छ व प्रदुषणमुक्त भारत अभियान व पर्यावरण संरक्षणचा संदेश देण्यासाठी त्यांनी सायकल प्रवास करण्याचा निर्णय घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राऊत यांनी गुजरात येथील द्वारका येथून सायकल प्रवासाला सुरूवात केली. द्वारका , जामनगर, चित्रोड, पाटण, राजस्थान, माउंट अबू, उदयपुर, अजमेर, जयपूर, दौसा, उत्तरप्रदेश, आग्रा, सौरिख, लखनऊ, अयोध्या, बस्ती, बिहार, गोपाल गंज, फर्वेसगांज, पश्चिम बंगाल, सिलीगुडी, मालबाजर, अलीपुरदुर, आसाम, बारामा, रांगिया, बरसोला, तेजपुर, गोहपुर असा प्रवास करून ते अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे पोहोचल आहे. राऊत यांच्या ठिकठिकाणी आगमन होताच त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला.

तर,हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी नागपुरचे प्रसिध्द सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी गेट वे ऑफ इंडिया मुंबई-चेन्नई-कोलकत्ता-दिल्ली-मुंबई असा सहा हजार किलोमीटरचा प्रवास सुरू केला आहे. तर प्रदुषणमुक्त भारत तसेच पर्यावरण संरक्षणासाठी चंद्रपूर महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी तथा क्रीडा प्रशिक्षक नामदेव राऊत यांनी गुजरात येथील द्वारका येथून अरूणाचल प्रदेशातील इटानगर पर्यंतचा ४ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. या दोन्ही सायकलपटूंचे कौतुक होत आहे.

नक्षलवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यांतर्गत येणाऱ्या हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच प्रकल्पातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रसिध्द सायकलपटू डॉ.अमित समर्थ यांनी लोकबिरादरी प्रकल्पासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून सुरू केलेला सहा हजार किलोमीटरचा संपूर्ण भारत प्रवास ते १४ दिवसांत पूर्ण करणार आहे. हा सायकल प्रवास डॉ. अमित यांनी सोमवार १५ फेब्रुवारी पासून सुरू केला आहे. दररोज किमान ५०० किलोमीटरचा प्रवास करून एका ठिकाणी मुक्काम करायचा, नंतर पुन्हा निघायचे असा त्यांचा दिनक्रम आहे. सध्या डॉ. अमित हे आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे पोहचले असल्याची माहिती आयोजन समितीतील जितू नायक यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.

डॉ. अमित यांनी २०१७ मध्ये रन ऑफ अमेरिका त्यानंतर २०१८ मध्ये रशियात ९ हजार १०० किलोमीटरची सायबिरियन रेस पूर्ण केली आहे. रेडबूलसह विविध संस्थांनी या कार्यासाठी प्रायोजकत्व स्वीकारले आहे. १४ दिवसांत हा सहा हजार किलोमिटरचा प्रवास पूर्ण केला जाणार असून, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तथा अमेरिकेतील प्रसिध्द संस्था देखील या सायकल प्रवासाची नोंद घेणार आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Namdev raut from chandrapur cycled from gujarat to arunachal to get rid of pollutionmsr