दापोली शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक दापोली नगपंचायत माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुसाळकर यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने खेड गोळीबार मैदान येथे जाहीर सभा ठेवली आहे. सभेच्या पूर्वसंध्येलाच शिवसेनेला हा मोठा झटका मानला जातोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा- अनिल जयसिंघानीयाला एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत आणलं होतं? सुषमा अंधारेंच्या दाव्याने वेगळं वळण; नक्की काय म्हटलं

दापोली नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी माजी आमदार संजयराव कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तसेच शिंदे गटाकडून सतत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परिवारावर खालच्या थरावर टीका होत असल्याने त्याचा तीव्र शब्दात निषेध करत प्रवेश करत असल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant kusalkars entry into the thackeray group mrj