मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण राज ठाकरे, हनुमान चालिसा आणि मशिदीवरील भोंगे यांच्याभोवती फिरत आहे. पण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि पत्नी शर्मिला ठाकरे यांनी नुकतचं एबीपी माझ्याच्या ‘माझा कट्टा’मध्ये सहभाग घेतला होता. यातून त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दुबईवरून धमकीचा फोन आल्याबाबत देखील खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरेच्या यांच्याकडे विद्यार्थी सेनेची जबाबदारी असताना, राज ठाकरे यांना दुबईवरून धमकीचा फोन आला होता. त्यावेळी राज ठाकरे यांच्या घरात फोन उचलण्यासाठी ऑपरेटर नव्हता. त्यामुळे शर्मिला ठाकरे यांनी हा फोन उचलला होता. दरम्यानच्या काळात देशात दंगे देखील झाले होते. यावेळी फोनवरील व्यक्तीने राज ठाकरे यांना जपून राहण्याचा इशारा दिला होता. पण संबंधित व्यक्ती नेमकी कोण होती, याबाबत कोणताही खुलासा महाकट्टामधून करण्यात आला नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Threat call to raj thackeray from dubai mahakatta rmm