News Flash

बिग बींच्या ‘त्या’ घरासमोर उभं राहून अॅश- अभिषेकने काढला फोटो

अलाहबादच्या घराचा काही भागच होता वापरात

ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, आराध्या बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच तिच्या वडिलांच्या अस्थि विसर्जनासाठी अलाहबादला गेली होती. यावेळी तिच्यासोबत पती अभिषेक बच्चन, मुलगी आराध्या बच्चनही होती. ऐश्वर्याची आई आणि भाऊसुद्धा तिच्यासोबत गेले होते. काही दिवसांपूर्वी संगम घाटावरील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अस्थि विसर्जन झाल्यानंतर बच्चन कुटुंबिय त्याच दिवशी मुंबईत परतले. पण, मुंबईत परतण्यापूर्वी अॅश, अभिषेक आणि आराध्या यांनी बिग बींच्या अलाहबाद येथील घराला भेट दिली.

अमिताभ बच्चन यांच्या अलाहबाद येथील घराला भेट देत अभिषेक, ऐश्वर्याने आणि आराध्याने घरासमोर उभं राहात फोटोसुद्धा काढले. एखाद्या सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे हे बच्चन कुटुंबिय मोठ्या कुतूहलाने त्या घरासमोर फोटोसाठी उभं राहिल्याचं पाहायला मिळालं. अॅश आणि अभिषेकचा हा अंदाज अनेकांसाठीच नवा होता. जुन्या गोष्टींशी आपलं एका वेगळ्या प्रकारचं नातं जोडलेलं असतं आणि कोणीही व्यक्ती कितीही मोठी झाली तरीही भूतकाळातील काही गोष्टींचा विसर कधीच पडत नाही हेच ज्युनियर बच्चनच्या वागण्यातून सिद्ध होत आहे.
कारण, असंही म्हटलं जातंय की, काही महिन्यांपूर्वी बिग बींनी याच घराचा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी काही आठवणींना उजाळाही दिला होता. सध्याच्या घडीला अमिताभ बच्चन हे तीन बंगल्यांचे मालक आहेत. मात्र हे महानायक एकेकाळी भाड्याच्या घरात राहात होते अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण, हे खरं आहे.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

सोशल मीडियावर नेहमीच काही फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या बिग बींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले होते. हे फोटो बिग बींच्या भाड्याच्या घराचे असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यांनी पोस्ट केलेला फोटो अलाहाबाद येथील घराचा असून, कधी काळी ते या घरात भाड्याने राहात होते. या प्रशस्त घरातील फक्त काही भागातच त्यांचा वावर होता. त्यामुळे आता जेव्हा अभिषेक आणि ऐश्वर्या अलाहबादला आले होते तेव्हा गतकाळच्या काही आठवणींना उजाळा देत त्यांनी या घरासमोर उभं राहून फोटो काढल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 5:18 pm

Web Title: bollywood actress aishwarya rai bachchan along with husband actor abhishek bachchan and daughter aaradhya bachchan pose outside amitabh bachchans allahabad home
Next Stories
1 PHOTO : करणचे यश- रुही झाले ६ महिन्यांचे
2 या कारणामुळे शाहरुखची बहिण प्रसारमाध्यमांपासून राहते दूर
3 अनुष्कासोबतच्या नात्याविषयी प्रभास म्हणतो…
Just Now!
X