अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘गोल्ड’ चित्रपट स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक्समध्ये मिळवलेल्या पहिल्या सुवर्ण यशाची गाथा ‘गोल्ड’च्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. रीमा कागती दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयसह मौनी रॉय, अमित साध, कुणाल कपूर, विनीत सिंग, सन्नी कौशल हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’चं प्रमुख आव्हान होतं. तरीही या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास २० कोटींची कमाई केली असल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषक गिरीश जोहर यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशभरातील जवळपास २७०० स्क्रीनवर हा चित्रपट दाखवण्यात येत आहे. या चित्रपटाचं कथानक पाहता प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला आहे, त्यामुळे ‘गोल्ड’ बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी २० कोटींची कमाई करेल अशी माहिती जोहर यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेसला’ दिली. जर्मनीत ब्रिटिशांसाठी खेळणारे भारतीय खेळाडू आणि त्यांचा व्यवस्थापक तपन दास यांच्या भोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं. स्वतंत्र भारताचा हॉकी संघ म्हणून ऑलिम्पिक्समध्ये खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंच्या जिद्दीची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळते आहे.  या चित्रपटाच्या निमित्तानं मौनी रॉय या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीनंदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar gold box office collection day