दिग्दर्शक महेश भट्ट यांचा ‘सडक’ हा बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट आहे. या हिट चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहते आनंदी होते. ‘सडक २’ या चित्रपटाच्या निमित्ताने महेश भट्ट तब्बल २० वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरणार आहेत. तसेच या चित्रपटाची निर्मिती मुकेश भट्ट यांनी केली आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीक समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीक सांगितली आहे. सडक २ हा चित्रपट येत्या २८ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टावर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे घरात बसून चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

‘सडक’ चित्रपटात अभिनेत्री पूजा भट्ट मुख्य भूमिकेत होती आणि आता ‘सडक’च्या सिक्वेलमध्ये देखील पूजा महत्वाची भूमिका साकारणार आहे. पूजा भट्टसह आलिया देखील चित्रपटात झळकणार आहे. तसेच त्यावेळी चित्रपटात संजय दत्तची भूमिका ३२ वर्षांच्या व्यक्तीची होती आणि आता सडकच्या सिक्वेलमध्ये संजय दत्त ५४ वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया पहिल्यांदाच वडीलांसोबत काम करणार आहे.

यापूर्वी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुरानाचा गुलाबो सिताबो, विद्या बालनचा शकुंतला देवी, लूटकेस, दिल बेचारा हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले होते. तसेच लवकरच जान्हवी कपूरचा गुंजन सक्सेना हा चित्रपट देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt share sadak 2 poster and release date avb