मराठीतील लोकप्रिय जोडी अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी लवकरच एक हिंदी चित्रपट ‘हाय जॅक’ करणार आहेत. म्हणजेच आगामी ‘हाय जॅक’ या हिंदी चित्रपटात हे दोघं भूमिका साकारणार आहेत. नुकताच त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या कॉमेडी चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आकर्ष खुराना दिग्दर्शित या चित्रपटात सुमित व्यास, मंत्रा, सोनाली सैगल, कुमुद मिश्रा यांच्याशी भूमिका आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासंदर्भात अमेय म्हणाला, ‘दिग्दर्शक म्हणून आकर्ष यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात असणाऱ्या सगळ्याच कलाकारांनी यापूर्वी नाटक, वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. त्यामुळे सगळी मंडळी आपलीच आहेत असं वाटत होतं. त्यांच्यासोबत काम करतानाही खूप मजा आली. मला हिंदी चित्रपटाची ऑफर आली म्हणून मी तो स्विकारला असं नाही. पण त्यानिमित्ताने मला एक वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली, म्हणून मी तो केला. यापुढे हिंदीतून एखाद्या चांगल्या भूमिकेबद्दल विचारणा झाली तर नक्कीच करेन.’

वाचा : रीना अगरवालने चाहत्यांसोबत शेअर केले फीटनेस फंडे 

चार- पाच जण मिळून पहिल्यांदा विमान हायजॅक करतात आणि त्यादरम्यान झालेल्या गोंधळातील हास्यकल्लोळ मजेशीर आहे. २० एप्रिल रोजी हा कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amey wagh and nipun dharmadhikari in hindi cinema high jack