बॉलिवूड इंडस्ट्रीमधील खलनायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमरीश पुरी यांची २२ जून रोजी जयंती होती. त्या निमित्ताने अनेक बॉलिवूड कलाकारांनी अमरीश पुरी यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. अभिनेते अनुपम खेर यांनी देखील अमरीश पुरी यांच्याशी संबंधीत एक पोस्ट लिहिली. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुपम यांनी इन्स्टाग्राम खात्यावर ही पोस्ट शेअर केली आहे. ‘अमरीश पुरी माझे खूप चांगले मित्र होते. या जगात नसलेल्या आपल्या मित्रांबद्दल बोलताना नेहमी दु:ख होते. ते एक महान अभिनेते होते’ असे अनुपम यांनी लिहिले होते.

सध्या अनुपम खेर त्यांचा आगामी चित्रपट ‘वन डे: जस्टिस डिलीवर्ड’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. दरम्यान अनुपम यांनी ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाशी संबंधीत एक मजेशीर गोष्ट सांगितली आहे. ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातील ‘मोगॅम्बो’च्या भूमिकेसाठी अनुपम खेर यांना पहिली पसंती देण्यात आली होती. ‘मिस्टर इंडिया चित्रपटातील मोगॅम्बोच्या भूमिकेसाठी अमरीश पुरींआधी मला विचारण्यात आले होते. परंतु एक-दोन महिन्यानंतर चित्रपट निर्मात्यांनी माझ्या जागी अमरीश पुरी यांना रिप्लेस केले’ असे अनुपम खेर म्हणाले. ‘जेव्हा आपल्याला एका चित्रपटातून बाहेर काढले जाते तेव्हा आपल्याला वाईट वाटते. पण जेव्हा मी मिस्टर इंडिया चित्रपटातील मौगॅम्बोची भूमिका पाहिली तेव्हा चित्रपट निर्मात्यांनी योग्य निर्णय घेतला असल्याचे मला जाणवले’ असे अनुपम पुढे म्हणाले.

अनुपम खेर यांचा ‘वन डे: जस्टिस डिलीवर्ड’ हा चित्रपट २८ जून २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनुपम खेर सह ईशा गुप्ता देखील झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anupam kher reveals not amrish puri he was the first choice to play mogambo in mr india avb