चित्रपट दिग्दर्शक अमर कौशिक यांनी ‘स्त्री’ सारखा भन्नाट विनोदी भयपट दिल्यानंतर ‘बाला’ हा अचूक मांडणी करणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. शाळकरी वयापासून केस उडवत हिरोप्रमाणेच टेचात वावरलेल्या मुलाचे ऐन तारुण्यात केसगळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते, हा कथाविषय असलेला ‘बाला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच हा चित्रपट तिकीटबारीबर चांगली कामगिरी करताना दिसतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुषमान खुरानाची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने १००.१५ कोटींची कमाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रदर्शनाच्या दिवसी ‘बाला’ने १०.१५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईचा आकडा वाढत असून या चित्रपटाने तब्बल १००.१५ कोटी रुपायांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे कमाईच्या आकडेवारीमध्ये अजून वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.


या चित्रपटामध्ये आयुषमान खुराणा, भूमि पेडणेकर आणि तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका आहे. या तगडय़ा कलाकारांबरोबरच सौरभ शुक्ला, सीमा पहावा, जावेद जाफरी, अभिषेक बॅनर्जी अगदी विहानच्या भूमिकेतील धीरेंद्र कुमार या नव्या-जुन्या कलाकारांच्या अभिनयाची साथ मिळाली आहे. कानपूरसारख्या शहरातील गल्ली, तिथली संस्कृती, मध्यमवर्गीय समाज, तिथल्या तरुणांची मानसिकता, तरुणांवर असलेला हिंदी चित्रपट आणि कलाकारांचा प्रभाव अशा अनेक गोष्टी चित्रपटात अफलातून रंगवण्यात आलेल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushmann khurrana film bala box office collection ssj