बॉलिवूड कलाकार कायमच त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि महागड्या वस्तूंमुळे चर्चेत असतात. यात अनेकदा सेलिब्रिटींच्या डिझायनर ड्रेस,पर्सची चर्चा होताना दिसते. कलाविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या खासकरुन त्यांच्या फॅशनसेन्ससाठी ओळखल्या जातात. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री भूमी पेडणेकर. अलिकडेच भूमीने एक फोटोशूट केलं असून यात तिने परिधान केलेल्या लेहंग्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
भूमीने तिच्या बहीणीसोबत सामिक्षा पेडणेकरसोबत फोटोशूट केलं असून यावेळी भूमीने परिधान केलेला लेहंगा प्रचंड महाग असल्याचं सांगण्यात येत आहे. भूमीने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाइन केलेला सिल्वर रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.
मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला हा लेहंगा तब्बल ६ लाख २५ हजार रुपये किंमतीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, भूमी लवकरच ‘बधाई दो’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता राजकुमार राव स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटापूर्वी ती ‘दुर्गामती’ या चित्रपटात झळकली होती.