बिग बॉस मराठी या शोच्या माध्यमातून अनेक वेळा समाजोपयोगी संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आज रंगणाऱ्या टास्कमध्येदेखील असाच एक संदेश देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील बराचसा भाग आज पाणी टंचाईने ग्रस्त असून त्यांना रोज गंभीर परिस्थितीला समोरं जावं लागत आहे. त्यामुळेच बिग बॉसमध्ये आज रंगणाऱ्या टास्कमधून ‘पाणी वाचवा’ हा संदेश देण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉसच्या घरात २४ तास पाणी पुरवठा होतो. परंतु, या परिस्थितीची प्रत्येक सदस्याला जाणीव असणे आवश्यक असल्याने आज घरात पाण्याचा वापर काटकसरीने करण्यात येणार आहे आणि यासाठीच पाण्याचे नियोजन कसे करावे याचा प्रत्यय सदस्यांना येणे महत्वाचे आहे. म्हणूनच पाणी जपून वापरा हे कार्य रीन या अग्रगण्य डिटर्जेन्ट ब्रान्डतर्फे सदस्यांवर सोपविण्यात येणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये रंगणार आहे, जी टीम सगळ्यात जास्त पाण्याची बचत करेल ती टीम विजेती ठरेल. तेव्हा बघूया हा टास्क घरातील सदस्य कसा खेळतील ? किती भांडण करतील ? कोणती टीम विजेती ठरेल ?

नेहा आणि माधवमध्ये वाद
अभिजीत बिचुकलेंमुळे आज नेहा आणि माधवमध्ये वाद होणार आहे. बिग बॉस यांनी आज घरातला पाणीपुरवठा बंद करणार अशी घोषणा केली. ही घोषणा होताच घरामध्ये गोंधळ उडाला. यामध्ये अभिजीत बिचुकलेंचा गोंधळ वेगळाच. ही घोषणा होताच बिचूकलेंनी लगेच बिग बॉसना विनंती केली कि, थोडा वेळ फ्रेश होण्यसाठी द्यावा. बिचुकले स्टोर रूममध्ये पाणी घेण्यास पोहचले. यावर नेहाने बिचुकलेंना बजावले अस करू नका पण ऐकत नाही हे बघितल्यावर तिने माधवला बिचुकले यांना समजविण्याची विनंती केली. माधवने त्यांना समजाविले जारमधल सगळ संपवू नका पाणी, आणि लगेच तोंड धुवून या, पण तुम्हाला पाणी आत ठेवण्यास परवानगी नाहीये. माधव बिचुकले यांना समजवत असताना नेहा परत मध्ये बोलल्याने माधवला राग आला आणि त्याचा आवज चढला “मला सांगितलसना बोलायला मग मला बोलू दे” माधवने बिचुकलेना ते नियम मोडत असल्याचे सांगितले. आता अभिजीत बिचुकले नियम मोडणार कि माधवच ऐकणार हे कळेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 2 participator water saving message ssj