चित्रपटसृष्टीमध्ये एकदा छायाचित्रकाराच्या नजरेत कोणती गोष्ट आली तर पुन्हा त्यांच्या कचाट्यातून इतक्या सहजासहजी सुटका शक्यच नाही. अशाच छायाचित्रकारांच्या कचाट्यात अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन आणि सैफ अली खान-अमृता सिंगची मुलगी सारा अडकली आहे. काही दिवसांपासूनच हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण, तो विषय पुन्हा मागे पडला आणि या दोघांकडेही अनेकांचच दुर्लक्ष झालं. पण, वांद्र्यातील एका ठिकाणी नुकतंच या दोघांना एकत्र पाहण्यात आलं आणि चर्चांना पुन्हा तोंड फुटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणताही बडेजावपणा किंवा दिखावा न करत हर्षवर्धन आणि सारा डिनर डेटला गेले होते. फिल्मी शॉट रिअल नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन या बहुचर्चित जोडीचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. आता हर्षवर्धन आणि साराचा हा फोटो बरंच काही सांगत असला तरीही त्यांच्यामध्ये नेमकं काय नातं आहे हे तर ते दोघंच जाणतात.

हर्षवर्धनच्या पदार्पणाच्या चित्रपटात त्याला यश मिळालं नसलं तरीही प्रभावी लूक्सच्या बळावर त्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्झिया’ या चित्रपटातून झळकलेला हर्षवर्धन सध्या ‘भावेश जोशी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. मुख्य म्हणजे आगामी चित्रपटापेक्षा ते सध्या सारासोबतच्या डेटिंग कनेक्शनमुळेच जास्त चर्चेत आला आहे. सारासुद्धा येत्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चिन्ह आहेत. तिची आई, अभिनेत्री अमृता सिंग साराच्या बॉलिवूड पदार्पणावर जास्त लक्ष केंद्रित करते आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor harshvardhan kapoor and saif ali khans daughter sara ali khans candid dinner date photo is going viral