बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या आपला आगामी चित्रपट ‘कबीर सिंग’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. २१ जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूरसोबत पहिल्यांदाच अभिनेत्री कियारा आडवाणी दिसणार आहेत. चित्रपटात शाहिद प्रेयसी सोडून गेल्यानंतर व्यसनाधीन झालेल्या अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान एका मुलाखतीत बोलताना शाहिद कपूरने सध्या आपल्याकडे कोणताच चित्रपट नसून आपण बेरोजगार असल्याचं सांगितलं आहे. आपण यापुढे नेमकं काय करणार आहोत याची आपल्यालाही उत्सुकता असल्याचं त्याने यावेळी म्हटलं आहे. जेव्हा आपल्याकडे काम नसतं तेव्हा करण्यासारखं खूप काही असतं असं शाहिदने सांगितलं.

‘कबीर सिंग’ हा चित्रपट सुप्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक आहे. ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट दक्षिणीकडे तुफान गाजला होता. ‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप वांगा यांनी केले होते. आता या रिमेकचे दिग्दर्शनही संदीप वांगा करत आहेत.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद कपूर बॉक्सर डिंग्को सिंह यांच्यावर बायोपिक करण्याचा विचार करत असून त्याची तयारीही सुरु केली आहे. आशियाई गेम्समध्ये बॉक्सिंग खेळासाठी भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून देण्याचा विक्रम नगंगोम डिंग्को सिंह यांच्या नावावर आहे. २०१३ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor shahid kapoor kabir singh sgy