‘क्वांटिको गर्ल’ म्हणा किंवा ‘देसी गर्ल’, अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर आहे हे नाकारता येणार नाही. बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळाल्यानंतर योग्य संधी मिळताच प्रियांकाने आंतरराष्ट्रीय कलाविश्वात उडी घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय खऱ्या अर्थाने तिच्यासाठी फायदेशीर ठरला. कारण ‘क्वांटिको’ या एका मालिकेमुळे तिला आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रेक्षकही दाद देऊ लागले. सध्याच्या घडीला विविध पुरस्कार सोहळे, हॉलिवूड कलाकारांच्या पार्ट्या आणि विविध कार्यक्रमांना ही ‘देसी गर्ल’ आवर्जून हजेरी लावते. कामाचा व्याप आणि व्यग्र वेळापत्रपक या साऱ्यामुळे ती बऱ्यापैकी परदेशात राहण्यालाच प्राधान्य देते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही वर्षांपासून परदेशवाऱ्या वाढल्यामुळे प्रियांकाने न्यूयॉर्कमध्ये एक स्वत:चे घर घेतले आहे. तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट पाहता नाताळ सणाच्या आधीच प्रियांकाने स्वत:ला ही खास भेट दिली आहे, असे म्हणायला हरकत नाही. या नव्या घराचे काही फोटो प्रियांकाने तिच्या स्नॅपचॅटवरुनही पोस्ट केले होते. यामध्ये तिच्या घराच्या खिडकीतून दिसणारं न्यूयॉर्क शहर अनेकांचेच लक्ष वेधत आहे. जगातील सर्वाधिक प्रसिद्ध अशा शहरांपैकी एक असणाऱ्या न्यूयॉर्क शहराची सुरेख झलक प्रियांकाच्या घरातून पाहायला मिळते. तिच्या घरातील सजावटीविषयी सांगावे, तर पांढऱ्या रंगाचा यात सर्वात जास्त वापर केला गेल्याचे लक्षात येते. त्यासोबतच, या घरात प्रियांकाची ओळख असलेली एक सुरेख उशीही ठेवण्यात आली आहे. ज्यामध्ये सोनेरी अक्षरांमध्ये ‘प्री’ असे लिहिण्यात आले आहे.

‘देसी गर्ल’चा हा विदेशी आशियाना सध्या सोशल मीडिया आणि बॉलिवूड वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे. मुख्य म्हणजे प्रियांकाचे हे घर आणि सध्याच्या घडीला तिच्याकडे कामाचा वाढता ओघ पाहता येत्या काही दिवसांमध्ये ती परदेशात स्थायिक होण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे.

पाहा : VIDEO : ‘घुमर’ करत दीपिका म्हणतेय ‘दिसला गं बाई दिसला’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress priyanka chopra luxurious dream home in new york take a look of her home