याहू… असे म्हणताक्षणीच विलक्षण धसमुसळा शम्मी कपूर व अगदी नाजूकशी सायरा बानू आणि कमालीच्या बर्फाळ वातावरणातील प्रेमाची आसक्ती व्यक्त करणारे गाणे डोळ्यासमोर आले असणारच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याहू… या… हू
चाहे कोई मुझे
जंगली कहे,
कहने दो कहता रहे
हम प्यार के तुफानो मे
गिरे है
हम प्यार करे…

प्रेमाची अशी बेफाम आणि बेभान कबूली ही तर खास शम्मी कपूर शैली. मग समोर प्रेमिका कोणी का असेनात. असा काय फरक पडतोय? येथे तर सायरा बानू होती. अगदीच नवखी. ‘जंगली’ ( १९६१) हा तिचा पहिलाच चित्रपट. त्यामुळेच तिच्या अभिनय व देहबोलीतून केवढा तरी नवखेपणा जाणवतो. पण पडदाभर यथेच्छ धुमाकूळ घालणाऱ्या शम्मी कपूरच्या प्रेमाच्या वादळासमोर उभे तर राह्यला हवे.
मेरे सीने मे भी दिल है
है मेरे भी कुछ अरमान
मुझे पत्थर तो ना समझो
मै हू आखिर इन्सान…

गाण्याच्या विलक्षण वेगावर शम्मी कपूर मनसोक्त, मनमुराद स्वार झालाय. प्रचंड थंड प्रदेशात आपण आहोत याचे त्याला कसलेच भान नाही. त्याच्या वेगाला पकडण्याचा सायरा बानूचा प्रयत्न चाललाय. बर्फावर नाचणे, लोळणे चाललयं. मध्येच स्केटिंगही करतात.

सर्द आहे कह रही है
यह कैसी बला की आग

गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन व पार्श्वगायक महम्मद रफी यांनी शम्मी कपूरचा प्रेमाचा जणू हल्ला गाण्यात अचूक पकडलाय. शम्मी कपूर प्रेम करताना एक प्रकारची जबरदस्तीच करतो पण त्याच्या अशा अदेवर नायिकादेखिल फिदा असत. येथेही सायरा त्याला मस्त प्रतिसाद देतेय. तो तर नजरेला नजर भिडवत प्रेम व्यक्त करतोय.

मै यहा से वहा
जैसे यह आसमान…

आजूबाजूच्या सौंदर्यासह शम्मी कपूर प्रेमात अखंड डुंबतो. दिग्दर्शक सुबोध मुखर्जीने त्याला केवढी तरी मोकळीक दिल्याचेही जाणवते. अशाने ‘हिरो’ अधिकच सुसाट गायला-नाचायला हवाच.

याहू… याहू…

अशा मोकाट गाण्याना त्या काळात प्रतिष्ठा नसे. पण गाण्याची लोकप्रियता वादातीत असते. हा ‘याहू’ आवाज प्रयाग राज यांचा आहे. कालांतराने पटकथाकार म्हणून त्याने करियर केले.

चाहे कोई मुझे जंगली कहे…

शम्मी कपूर एकूणच अख्खे शरीर हलवत, नाचवत डोळ्यासमोर येतो.
दिलीप ठाकूर

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood music hindi movie junglee song yahoo chahe koi mujhe junglee kahe