२००९ साली ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या चित्रपटातली गाणी संवाद चित्रपटाची कथा हे सर्वच सुपरहिट ठरलं. यासोबतच कौतुक झालं ते आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांच्या पडद्यावरील मैत्रीचं. आता हे तिघं पुन्हा एकदा एकत्र आलेले दिसले. त्यांना एकत्र पाहून आता ‘थ्री इडियट्स’चा दुसरा भाग प्रदर्शित होणार की काय अशा चर्चा रंगल्या आहेत. करीनानं काही दिवसांपूर्वी थ्री इडियट्स चित्रपटाच्या सिक्वेलबाबत एक व्हिडीओ शेअर केला होता. आता बोमन इराणीनेही या चित्रपटाच्या स्किवेलबाबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- VIDEO बुरखा घालून इफ्तार पार्टीत पोहचली राखी सावंत; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, “नाटकी…”

मध्यंतरी शर्मन जोशीने त्याचा आमिर खान आणि आर माधवनबरोबरचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमधून ‘३ इडियट्स’चा सीक्वल येणार असल्याचे संकेत मिळाले होते. पण हे तिघे शर्मनच्या आगामी ‘काँग्रॅज्युलेशन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र आले होते.

हे सगळं खोटं असल्याचा दावा नुकताच करीना कपूरने केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिने या तिघांच्या व्हायरल होणाऱ्या प्रेस कॉन्फरन्सवर भाष्य केलं होतं. . हे तिघे काहीतरी लपवत आहेत, आणि हे शर्मनच्या चित्रपटाचं प्रमोशन तर अजिबात करत नाहीयेत. मला वाटतंय ते सीक्वलसाठी एकत्र आले आहेत. पण हे तिघेच का, तिथे मी पण हवी ना. माझ्याशिवाय कसं शक्य आहे? त्यानंतर आता बोमन इराणीनं थ्री इडियट्स चित्रपटाबाबत एक व्हिडीओ शेअर केला.

हेही वाचा- राहुल गांधी संदर्भातील ‘त्या’ ट्वीटवरून चित्रपट निर्मात्याची स्वरा भास्करवर टीका; अर्बन नक्षली उल्लेख करत म्हणाले, “अमेठीचा आवाज…”

व्हिडीओमध्ये बोमन म्हणतो, ‘तुम्ही हे काय करत आहात? व्हायरसशिवाय थ्री इडियट्सचा विचार तुम्ही कसे करु शकता? बरं झालं करीनानं मला सांगितलं. नाही तर मला हे कळालच नसतं. मला वाटलं होतं आपली मैत्री आहे? पण तुम्ही मला सांगितलं नाही. मला हे जावेद जाफरीला सांगावं लगेल.’ या व्हिडीओला बोमननं कॅप्शन दिलं, ‘ते व्हायरसशिवाय ३ इडियट्सचा सिक्वेल कसा बनवू शकतात? व्हायरस व्हिलन नहीं होगा तो कौन होगा, और क्या ही होगा?’ बोमन इराणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

हेही वाचा- ‘त्या’ प्रश्नाला वैतागून अमिताभ बच्चन यांनी रेखावर उचलला हात? नेमकं काय घडलंं होतं, वाचा

बोमनच्या व्हिडीओला शर्मन जोशीनं कमेंट करत उत्तर दिलं आहे, ‘सॉरी व्हायरस म्हणजे बोमन इराणी सर, तुम्ही चिडू नका. मी लवकरच सविस्तर सांगेन… प्लीज फोन उचला’

दिग्दर्शक राजकुमार यांनी थ्री इडियट्स चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. तर विधू विनोद चोप्रा यांनी चित्रपटाची निर्मिती केली होती. थ्री इडियट्सच्या सिक्वेलची अधिकृत घोषणा झालेली नसून लवकरच यामागील सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bomanirani viral video on instagram about sequel of popular movie 3 idiots dpj
First published on: 26-03-2023 at 10:59 IST