सध्या बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदूकोण तिचा आगामी चित्रपट ‘छपाक’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील दीपिकाचा लूक पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चाहत्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वचजण दीपिकाचे या भूमिकेसाठी कौतुक करत आहेत. त्यातच दीपिकाची आई उज्जला पदूकोण यांनी दिलेली एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. या मुलाखतीदरम्यान दीपिकाच्या आईने दोन्ही मुली आणि पतीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. ‘एकदा माझ्यावर अशी वेळ आली होती की माझ्या दोन्ही मुली आणि पतीने मला घराबाहेर काढण्याचा विचार केला होता’ असे उज्जला म्हणाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उज्जला यांच्या वडिलांचे शिक्षण ब्रिटीश बोर्डिंग स्कूलमध्ये झाले होते. त्यामुळे त्यांच्या घरात सतत शिस्तप्रिय वातावरण असे. ‘माझ्या घरी कडक नियम असत आणि आम्हा सर्वांना ते पाळावे लागत असत. अशा वातावरणात वाढल्यामुळे मला ती सवय लागली होती. पण माझ्या या सवयीमुळे माझे पती आणि दोन्ही मुली मला त्रासल्या होत्या’ असा खुलासा उज्जला यांनी केला.

आणखी वाचा : रामायणातील ‘सीता’ आता कशी दिसते? तुम्हीच पाहा…

‘मी माझ्या सवयींप्रमाणे माझ्या कुटुंबीयांना वागवत असते. त्यामुळे माझ्या घरातील सर्वजण मला त्रासले होते. एकदा तर पती आणि दोन्ही मुलींनी मला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता’ असे उज्जला पुढे म्हणाल्या.

आणखी वाचा : …अखेरच्या क्षणी मोडलं सलमानचं लग्न; साजिदनं सांगितला घडलेला प्रसंग

दीपिका लवकरच ‘छपाक’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची कथा अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात दीपिका ही लक्ष्मीची भूमिका साकारत असून त्यासाठी तिने प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केला. या वर्षाच्या सुरुवातीला ‘छपाक’च्या शूटिंगची सुरुवात झाली होती. तर जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मेघना गुलजार या चित्रपटाची दिग्दर्शक आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone decide to throw out his mother from house avb