जवळपास १४ वर्षांपासून सलमान खानच्या घरी साजरा होणारा गणेशोत्सव म्हणजे अनेकांसाठीच आकर्षणाचा विषय. बऱ्याच सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा विराजमान होतात. पण, या साऱ्यामध्ये सलमानच्या घरी साजरा होणाऱ्या गणोशोत्सवाची शान काही वेगळीच. यंदा मात्र भाईजान सलमानच्या घारी बाप्पा विराजमान झाले नसून, त्याच्या बहिणीच्या म्हणजेच अर्पिताच्या घरी गणरायाची पूजा करण्यात आली. असं नेमकं का झालं असावं हाच प्रश्न अनेकांच्या मनाच घर करत होता. अनेकांनी याविषयी स्वत:चे अंदाज बांधण्यास सुरुवातही केली होती. पण, आता मात्र यामागचं मुळ कारण समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्पिताच्या पतीने म्हणजे आयुष शर्माने याविषयी सर्वांच्या शंका दूर केल्या आहेत. सलीम आणि सलमा खान यांना पाहुण्यांची उठबस आणि एकंदर या संपूर्ण उत्सवाची आखणी करण्यात काही अडचणी येत होत्या. त्यातही बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी घरीसुद्धा बरीच गर्दी होत होती, ज्यामुळे जागेचा प्रश्नही उद्भवायचा. त्यामुळेच दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अर्पिता आणि आयुषने नव्याने खरेदी केलेल्या घरात हा उस्तव साजरा करण्यात आला.

वाचा : भजन, खटखटे लाडू आणि अमाप उत्साह..

दरम्यान, आपल्या घरी हा उत्सव सुरु केल्यापासून पुढे कधीपर्यंत सुरु राहिल याची खुद्द अर्पितालाही काहीच कल्पना नव्हती. पण, सध्याच्या घडीला तो खान कुटुंबातील सर्वांच्याच आवडीचा सण झाला असून, वर्षभरात या सणाची सगळेच अगदी आतुरतेने वाट पाहात असतात हेच स्पष्ट झालं आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गणेशोत्सवाचा कल्ला नसला तरीही अर्पिताच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचं विसर्जन गॅलेक्सी गार्डनमध्येच करण्यात येणार आहे. सलमान खान आणि त्याच्या घरी साजरा केल्या जाणाऱ्या या सणाचा उत्साह नेहमीच अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतो. संपूर्ण खान कुटुंबियांसह खुद्द सलमानही या उत्सवात सहभागी होऊन बाप्पाची सेवा करतो. यंदाही त्याने व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून बाप्पाची सेवा करण्याला प्राधान्य दिल्याचं म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganeshotsav 2017 this is why bollywood actor salman khan not celebrated ganesh chaturthi at galaxy apartments this year arpita khan sharma