भ्रष्ट राजकारणी आणि अधिका-यांच्या विरोधात लढणा-या पोलिस अधिका-याची कथा असलेल्या ‘अर्ध सत्य’ या प्रसिद्ध हिंदी चित्रपटाचा सिक्वल बनणार आहे. ‘अर्ध सत्य’ चित्रपटात ओम पुरी, स्मिता पाटील, सदाशिव अमरापूरकर आणि नसीरुद्दीन शाह यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दिग्दर्शक गोविंद निहलानी आणि निर्माते मनमोहन शेट्टी यांनी या चित्रपटाचा सिक्वल बनवण्याचे ठरवले आहे. मूळ चित्रपटाचे दिगदर्शन निहलानी यांचेच असून, सिक्वलच्या कथेवरील त्यांचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.निहलानी म्हणाले, कथेवरील काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल. त्यांना कथेतील बदल आणि मूळ कथा पुढे नेण्यामध्ये समन्वय साधायचा होता. चित्रपटातील कलाकारांची निवड होणे अजून बाकी असून, ओम पुरी यांना भूमिका देण्याची इच्छा निहलानी यांनी दर्शवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govind nihalani to make a sequel to ardh satya