क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल म्हणजेच इंडियन प्रिमीयर लीगला अवघ्या काही दिवसांनी सुरुवात होणार आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून आयपीएलच्या ११ व्या हंगामासाठी बरीच तयारी करण्यात येत आहे. क्रिकेटचा हा महाकुंभ सुरु होण्यापूर्वी त्याचा उद्घाटन सोहळाही पाहण्याजोगा असतो. अनेक कलाकार आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचा सहभाग सणाऱ्या या सोहळ्यामध्ये काही प्रशंसनीय कलाकृतीही पाहायला मिळतात. यंदाच्या वर्षी आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात अभिनेता वरुण धवनही सर्वांची मनं जिंकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांचा हवाला देत ‘फायनॅंशियल एक्सप्रेस’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी वरुणला ६ कोटी रुपये इतकं मानधन देण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला बी- टाऊनमध्ये आघाडीवर असणाऱ्या अभिनेता रणवीर सिंग याला मिळणाऱ्या मानधनाचा आकडाही वरुणच्या मानधनापेक्षा कमी आहे असं म्हटलं जात आहे. आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात फक्त पंधरा मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी रणवीरला पाच कोटी रुपये इतकं मानधन मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे मानधनाच्या बाबतीत वरुण रणवीरपेक्षा सरस ठरला आहे, असंच म्हणावं लागेल.

ब्रिटनच्या राजकुमाराची शाही लग्नपत्रिका पाहिलीत का?

इथे लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे कलाकारांची मांदियाळी असणाऱ्या आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात सर्वाधिक मानधन मिळणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीतही वरुण आघाडीवर आहे. वरुणची लोकप्रियता आणि चाहत्यांशी असणारं त्याचं नातं या सर्व गोष्टी नजरेत घेतच वरुणच्या मानधनाचा आकडा निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या खास सोहळ्यात तो आपल्या चित्रपटातील गाजलेल्या गाण्यांवर ठेका धरताना पाहायला मिळणार आहे. वरुण आणि रणवीरशिवाय अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, परिणीती चोप्रासुद्धा उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2018 bollywood actor varun dhawan paid more than ranveer singh to perform at opening ceremony