संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’नंतर अभिनेता रणवीर सिंगने यशाचं आणखी एक शिखर गाठलं. त्याच्या दमदार अभिनयाची चर्चा बॉलिवूड विश्वात होऊ लागली. शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांसारखे सुपरस्टार्स असतानाही अत्यंत कमी वेळात त्याने आपलं स्थान भक्कम केलं. याचाच धसका सध्या बॉलिवूडच्या दबंग खान अर्थात सलमानने घेतल्याचं दिसतंय. रणवीरच्या चित्रपटाशी टक्कर टाळण्यासाठी सलमानने त्याच्या आगामी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलल्याची माहिती समोर येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘दबंग ३’ हा सलमानचा बहुप्रतिष्ठित चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, रणवीरच्या ‘सिम्बा’ या चित्रपटाशी सामना टाळण्यासाठी त्याने या चित्रपटाचं प्रदर्शन २०१९पर्यंत ढकलल्याचं वृत्त ‘एशियन एज’ने दिलं आहे. डिसेंबरमध्येच रणवीरचा ‘सिम्बा’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर आणि सारा अली खान ही नवीन जोडी पडद्यावर एकत्र येणार आहे. त्याची प्रचंड उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.

वाचा : रेखा ‘या’ चित्रपटासाठी गाणार रॅप साँग

सलमान खान आता ‘दबंग ३’साठी २६ जानेवारी २०१९ ही तारीख निश्चित करण्याच्या विचारात असल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्या सलमान त्याच्या आगामी ‘रेस ३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर तो ‘दबंग ३’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ‘दबंग’ सीरिजचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is salman shying away from box office clash with ranveer singh