द कपिल शर्मा शोवरची संकटे काही केल्या कमी होत नाहीत असेच वाटते. कपिल आणि सुनील ग्रोवरमध्ये झालेल्या वादानंतर हा शो नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता कपिलचे जुने साथीदार अली असगर, सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसलेसह शोची क्रिएटिव्ह डायरेक्टर प्रीति सिमोसने कृष्णा अभिषेकसोबत हात मिळवणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिलीप कुमार यांचे पाकिस्तानमधील घर जमीनदोस्त

लवकरच ही टीम सोनी टिव्हीवरच नवीन शो घेऊन येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या तर सुनील ग्रोवरही या शोमध्ये दिसेल. मेलबर्नहून मुंबईमध्ये परतत असताना कपिलने मद्यधुंद अवस्थेत सुनीलला शिवीगाळ केली होती. एवढेच नाही तर त्याच्या दिशेने कपिलने बूटही फेकला होता.

असे असले तरी कृष्णाने या शोबद्दल अजून काहीही सांगितले नाही. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या नव्या शोचे नाव ‘कॉमेडी कंपनी’ असू शकते. कपिल शर्माच्या शोबद्दल बोलायचे झाले तर, सलमान खानच्या ‘दस का दम’ शो येईपर्यंतच हा कार्यक्रम सुरु ठेवण्यात येणार आहे. एकदा का सलमानचा हा शो सुरू झाल्यावर’ द कपिल शर्मा शो’ बंद करण्यात येणार आहे.

आर्चीच्या दहावीच्या निकालाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल

सध्या कपिल शर्मासाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे बीएआरसीच्या ताज्या अहवालानुसार पुन्हा एकदा त्याचा शो टीआरपी रेटींगमध्ये टॉप १० मध्ये आला आहे. शोने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. याआधी हा शो १४ व्या स्थानापर्यंत घसरला होता. त्यामुळे कपिल आणि त्याच्या टीमला यश मिळाले असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil sharma show contestants ali asgar sugandha mishra sunil grover joined hands with rival krushna abhishek soon appear in comedy company