सध्या टीव्ही वरील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असणारा शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ सोनी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या केबीसी पर्व ११च्या सूत्रसंचालनाची धूरा बिग बींच्या खांद्यावर सोपावण्यात आली आहे. शोमध्ये अनेकदा अमिताभ त्यांच्या आयुष्यातील मजेशीर किस्से सांगताना दिसतात. तसेच हॉट सीटवर बसलेले स्पर्धेक देखील त्यांच्या आयुष्यातील संघर्ष किंवा अनुभव सांगत असतात. कधी कधी हेच स्पर्धक अमिताभ यांच्या समोर भावूक झाल्याचे पाहायला मिळतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केबीसीमध्ये नुकताच पायल पुरवेश शाह स्पर्धक म्हणून हॉट सीटवर बसल्या होत्या. पायल यांनी खूप चांगला खेळ खेळला. त्यांनी त्यांच्या चारही लाइफलाइन वापरुन स्पर्धेत १२ लाख ५० हजार रुपयांचा पल्ला पार केला. त्यानंतर पायल यांनी त्यांच्या भावाचा मजेशीर किस्सा सांगितला. पायल यांचा भाऊ बिग बींचा मोठा चाहता असल्याचा खुलासा केला.

आणखी वाचा : शिक्षिका असूनही देता आले नाही या प्रश्नाचे उत्तर

‘सर, माझा भाऊ तुमचा खूप मोठा चाहता आहे. त्याने त्याचे नाव बदलून वीडीसी (विजय दीनानाथ चौहान) असे ठेवले आहे. तुम्हाला सनबाथ घेताना पाहण्यासाठी त्याने तुमच्या बंगल्या शेजारी असलेल्या सत्य मूर्ती अपार्टमेंटमध्ये घर घेतले आहे’ असे पायला यांनी सांगितले. त्यावर अमिताभ यांनी ‘मी सनबाथ घेतो हे त्याला कसं माहित?’ असा प्रश्न विचारला. ‘सर, हे मला माहित नाही. पण माझा भाऊ तुमचा खूप मोठा चाहता आहे. त्याने त्याच्या कंपनीचे नाव देखील वीडीसी ठेवले आहे’ असा खुलासा पायल यांनी केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kbc contestant says that her brother is big fan of amitabh and to see amitabh he did lots of things avb