क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीच्या आत्मचरित्रपटात पत्नी साक्षी धोनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कियारा आडवानीने घराणेशाही ही प्रत्येक ठिकाणी असल्याचे म्हटले. बॉलिवूडवर नेहमीच घराणेशाहीचा आरोप करण्यात आला आहे. बॉलिवूडमध्ये पूर्वजांच्या नावाचं कोणतही पाठबळ नसताना चित्रपटसृष्टीत आलेल्या कलाकारांच्या स्ट्रगलमध्ये घराणेशाहीचा मुद्दा हमखास येतो. पण असं असलं तरी बाहेरुन येणाऱ्यांसाठी बॉलिवूडचे रस्ते काही बंद होत नाही, असे कियाराने सांगितले. आयएएनएस या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कियाराने आपल्या एका व्यक्तव्यात म्हटले की, कोणत्याही क्षेत्रात घराणेशाही असतेच. काम मिळवण्यास त्या क्षेत्रातील ओळखीच्या व्यक्तींचा उपयोग नेहमीच होतो. पण मला असेही अनेक कलाकार माहित आहेत ज्यांनी स्व-कष्टाने आपली ओळख बनवली आहे.
कृष्णा- सुनील देणार कपिल शर्माला टक्कर?
अगदी उदाहरण द्यायचे झाले तर, प्रियांका चोप्राचेच बघा ना.. तिने जे मिळवलं आहे ते काही कलाकारांच्या मुलांनाही जमले नाही. त्यामुळे मला नेहमीच असं वाटतं की प्रत्येकाचं स्वतःच असं नशीब असतं. तुम्ही एका कलाकाराचे मुल असता तेव्हा तुम्हाला पहिला सिनेमा कदाचित सहजरित्या मिळेल. पण त्यानंतरच यश हे प्रेक्षक आणि त्यांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून असते.
दहावीच्या परीक्षेतही ‘सैराट’च्या आर्चीची ‘फर्स्ट क्लास’ कामगिरी
‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमानंतर कियाराने ‘मशीन’ सिनेमात काम केले होते. कियाराला हेही मान्य आहे की बॉलिवूडमध्ये पक्षपात केला जातो. पण तरीही असे अनेक लोक आहेत ज्यांनी स्वतःची ओळख बनवली आहे. कियाराने २०१४ मध्ये अक्षय कुमारची निर्मिती असलेल्या ‘फगली’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.