बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता हिने ‘हंड्रेड’ या वेब सीरिजच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. ‘अंदाज’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणारी लारा दत्ता एकाच प्रकारच्या भूमिकांना वैतागून बॉलिवूडमधून बाहेर पडली होती. परंतु अष्टपैलू अभिनेत्री असतानाही तिला एकाच प्रकारच्या भूमिकांसाठी का विचारलं जात होतं? लाराने बॉलिवूडची पोलखोल करत या प्रश्नाचं उत्तर दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य पाहा – “करण माझ्यावर हसला होता म्हणून आज रडतोय”; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूडलाईफ डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत लारा दत्ताने आपल्या फिल्मी करिअरवर गप्पा मारल्या. यावेळी तिने एकाच प्रकारच्या भूमिका करण्यामागचं कारण सांगितलं. ती म्हणाली, “बॉलिवूडमध्ये प्रयोगशिल निर्मात्यांची फारच कमतरता आहे. फार कमी निर्माता धोके पत्करायला तयार असतात. एखाद्या कलाकाराची एखादी व्यक्तिरेखा सुपरहिट झाली की त्याला त्याच प्रकारच्या भूमिका दिल्या जातात. कारण एकच फॉर्म्युला पुन्हा पुन्हा वापरुन त्यांना नफा मिळवायचा असतो. परिणामी कलाकारावर एकाच प्रकारच्या भूमिकांचा ठसा पडतो. असाच काहीसा प्रकार माझ्याही बाबतील घडला. माझ्या काही सोज्वळ भूमिका गाजल्या त्यानंतर मला सोज्वळ पत्नीच्याच भूमिकांसाठी विचारलं जाऊ लागलं. अखेर या प्रकाराला कंटाळून मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.”

अवश्य पाहा – “तुझं ऐकून आम्ही पानमसाला खातोय”; Immunity Booster च्या जाहिरातीवरुन अजय देवगण ट्रोल

लारा दत्ता बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री आहे. २००३ साली ‘अंदाज’ या चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर ‘मस्ती’, ‘नो एन्ट्री’, ‘पार्टनर’, ‘ओम शांती ओम’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केले. गेल्या काही काळात तिने ‘डेव्हिड’, ‘सिंग इज ब्लिंग’, ‘फितूर’, ‘अझर’ अशा काही चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र हे चित्रपट सुपरफ्लॉप ठरले. परिणामी काही काळात ती सिनेसृष्टीपासून दूर होती. आता वेब सीरिजच्या माध्यमातून तिने पुनरागमन केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lara dutta why bollywood offer the same type of role mppg