झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. या मालिकेत त्याने राणादा हे पात्र साकारलं होतं. त्यानंतर सध्या हार्दिक ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकत आहे. त्याबरोबर आता लवकरच तो एका कार्यक्रमातही झळकणार आहे. यापाठोपाठ आता हार्दिक जोशी एका चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या टीझरही प्रदर्शित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हार्दिक जोशीच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘क्लब 52’ असे आहे. या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला आहे. या टीझरवरुन या चित्रपटात पत्त्यांचा डाव आणि त्याच्याशी संबंधित कथानक असल्याचा पाहायला मिळत आहे. एक डाव नियतीचा अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. हा चित्रपट अॅक्शनपॅक्ड असून यात हार्दिक जोशी धमाकेदार भूमिकेत दिसणार आहे.
आणखी वाचा : “तुझी नवीन मालिका किंवा चित्रपट कधी येणार?” सोहम बांदेकरने दिले संकेत, म्हणाला…

नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित कोळी यांनी केले आहे. या चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. येत्या १५ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : लाडक्या बायकोला २३ दिवस २३ गिफ्ट्स! अमृता खानविलकरच्या वाढदिवसानिमित्त पती हिमांशू मल्होत्राची खास पोस्ट; म्हणाला…

बजरंग बादशाह यांच्या कथेवर राकेश शिर्के यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. कौशल गोस्वामी यांनी छायांकन, करण आणि दर्शन यांनी संगीत, अजय वाघमारे, बजरंग बादशाह, सुजाता पवार यांनी गीतलेखन, आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardeek joshi radha sagar bhau kadam starrer action packed club 52 movie teaser release