‘बंगाली ब्युटी’ मौनी रॉय लवकरच अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाची शू्टिंग संपत नाही तोपर्यंत तिला आणखी ऑफरसुद्धा मिळाली. ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात मौनी भूमिका साकारणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ब्रह्मास्त्र’च्या टीमसोबत तिची चर्चा झाली असून पुढच्या वर्षी ती शूटिंगला सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘धर्मा प्रॉडक्शन्स’चा हा सर्वांत मोठा चित्रपट असून अयान मुखर्जी याचं दिग्दर्शन करणार आहेत. हे वर्ष मौनीसाठी खास ठरलं असं म्हणायला हरकत नाही. कारण छोट्या पडद्यावरून तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर आता लगेचच दुसरी मोठी ऑफरसुद्धा मिळाली.

वाचा : टीव्हीवर लवकरच परतणार ‘बालिका वधू’

‘ब्रह्मास्त्र’मधील मौनीच्या भूमिकेविषयी अधिक माहिती अद्याप समोर आली नसून मौनी आणि चित्रपटाच्या टीमकडूनही अधिकृत घोषणा झाली नाही. दरम्यान, मौनी सध्या ‘गोल्ड’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. स्वातंत्र्यानंतर हॉकीमध्ये भारताने कशाप्रकारे सुवर्णपदक जिंकले, यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. अक्षय आणि मौनीसोबतच यामध्ये अमित सध आणि कुणाल कपूर यांच्याही भूमिका आहेत. पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mouni roy bags her second bollywood project after akshay kumar gold