सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, काळजीचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
फोटो गॅलरीः चेन्नईतील पूरग्रस्तांना सेलिब्रेटींचा मदतीचा हात
अर्थमंत्री अरुण जेटली यांची कन्या सोनाली हिचा काल लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला शंकर महादेवन यांनीही उपस्थिती लावली होती. मात्र, तेथे त्यांना अचानक छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी ईसीजी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात थांबण्याचा सल्ला दिला. तसेच, डॉक्टरांनी शंकर यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-12-2015 at 10:55 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Music composer shankar mahadevan hospitalised in delhi