सोनी वाहिनावरील ‘इंडियन आयडल’ पर्व ११ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देशातील अनेक लोक त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शोच्या मंचावर परफॉर्म करत आहेत. या शोच्या सूत्रसंचालनाची धूरा आदित्य नारायणवर सोपावण्यात आली आहे तर नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि अनु मलिक हे परिक्षक म्हणून काम करत आहेत. शोमध्ये सहभागी होणारे काही स्पर्धक त्यांच्या सुमधूर आवाजने परिक्षकांसह चाहत्यांची मने जिंकतात. तर दुसरीकडे असे काही स्पर्धक पोहोचले आहेत ज्यांचा आवाज ऐकायची पण इच्छा होणार नाही. काही स्पर्धकांचा आवाज ऐकून परिक्षकांना डोकेदुखी झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक स्पर्धक असे ही आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात संघर्ष करुन इंडिन आयडल शोच्या ऑडिशना हजेरी लावली आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार इंडियन आडयल पर्व ११च्या मंचावर परिक्षक म्हणून बसलेल्या नेहा कक्करे स्पर्धकाला दिवाळी साजरी करण्यासाठी १ लाख रुपये भेट म्हणून दिले असल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा : Indian Idol 11: एका एपिसोडसाठी नेहाला मिळते ‘इतके’ मानधन

या स्पर्धकाचे नाव दिवास असे असून तो झारखंड येथे राहतो. या स्पर्धकाने पैशांच्या आभावी गेल्या सहा वर्षांपासून आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली नव्हती. त्याने गेल्या सहा वर्षांत कंपनीमध्ये काम करत असताना केवळ आकाशात फुटणारे फटाके दूरुन पाहिले होते. पण ती साजरी करण्याचा सुखद अनुभव त्याने स्वत: घेतला नव्हता. यंदाची दिवाळी स्पर्धकाने आपल्या कुटुंबासोबत आनंदाने साजरी करावी यासाठी नेहाने त्याला एक लाख रुपये भेट म्हणून दिले आहेत.

आणखी वाचा : Video : …म्हणून नेहा कक्करने चपलेने मारले भावाला

दिवास याचे बोलणे ऐकून नेहा भावूक होते आणि त्याला दिवाळी साजरी करण्यासाठी एक लाख रुपये भेट म्हणून देत असल्याचे वृत्त ‘पिंकविला’ने दिले आहे. तसेच कुटुंबीयांसाठी नवे कपडे आणि मिठाई घेऊन जाण्याचा सल्लाही नेहाने स्पर्धकाला दिला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neha kakkar gave one lakh rupees to indian idol contestant divas avb