बॉलीवूडमध्ये सर्वात पहिले कोणत्या घराण्याचे नाव घेतले जात असेल तर ते कपूर खानदान आहे. पृथ्वीराज कपूर यांच्या तब्बल चार पिढ्यांनी आतापर्यंत बॉलीवूडवर वर्चस्व गाजविले. पृथ्वीराज कपूर, राज, शम्मी, शशी, रणधीर, रितू नंदा, रिशी, राजीव, रणबीर, करिश्मा, करिना आणि पुढेही ही यादी अशीच वाढत जाणारी आहे. या यादीमध्ये आता कपूर घराण्यातील आणखी एका नव्या चेहऱ्याचा समावेश होणार आहे. राज कपूर यांचा नातू अरमान जैन नंतर त्याचा भाऊ आदर जैन  बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज झाला आहे. आदर हा राज कपूर यांची कन्या रिमा जैन यांचा दुसरा मुलगा आपल्या भावाच्या पाठोपाठ बॉलिवूडमध्ये आपले नशिब आजमावण्यासाठी तयारी करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन वर्षापूर्वी सैफअली खान निर्मित  ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटातून शो मॅन राज कपूर यांचा वारसदार अरमान जैन याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर आता आदरच्या बॉलिवूडमधील पदार्पणासाठी कपूर घराणे तयारी करत आहे. कपूर घराण्याशी नाळ असणाऱ्या आदरला आगामी चित्रपटासाठी पूर्ण प्रशिक्षण देण्यात येत आहे. यशराज फिल्मच्या बॅनरखाली हबीब फैसल दिग्दर्शित आगामी चित्रपटातून आदर आपल्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात करेल. आदरने चित्रपट सृष्टीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर करण जोहरच्या बहुचर्चित ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटात साहय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यशराज फिल्म प्रोडक्शनच्या दिग्दर्शक शानू शर्मा यांनी आदरला आपल्या नव्या चित्रपटात संधी दिली आहे. आदरची निवड पक्की केल्यानंतर अदित्य चोप्रा आणि त्यांची टीम कपूर घराण्यातील नव्या चेहऱ्यासाठी नव्या अभिनत्रीच्या शोधात आहेत.  राज कपूर यांचा वारसा सांगणाऱ्या कपूर घराण्याचे वारस करीना, करिश्मा, रणबीर यांनी बॉलीवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करून दाखविले आहे. चित्रपटसृष्टीत आपले स्थान आणि वेगळी अशी ओळख निर्माण करण्यात या तिघांनी यश मिळविले. त्यानंतर अरमान जैन याने  ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटातून शो मॅन राज कपूर यांचा  वारसा घेऊन  बॉलिवूडमध्ये दाखल झाला होता.  लग्नापूर्वी मित्र-मैत्रीण असणाऱ्या जोडप्याचे आयुष्य लग्नानंतर कसे बदलून जाते याची कथा ‘लेकर हम दिवाना दिल’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One more kapoor clan aadar jain will entered in bollywood soon