बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. ती सतत सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच प्रितीने सोशल मीडियावर पती जीन गुडइनफला (Gene Goodenough) वाढदिवसाच्या शुभेच्छा देत काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
नुकताच प्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पती जीन गुडइनफसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. हे फोटो शेअर करत तिने जीनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तू माझा जवळचा मित्र आणि माझ्या आनंदाचा स्त्रोत आहेस. माझे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’ या आशयाचे कॅप्शन प्रितीने दिले आहे.
प्रितीने शेअर केलेल्या या फोटोंवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकांनी जीनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये काही सेलिब्रिटी देखील आहेत.
प्रीतीने ‘दिल से’ या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. या चित्रपटासाठी तिला बेस्ट डेब्यु फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. प्रिती आजवर तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिने ‘सोल्जर’, ‘क्या कहना’, ‘चोरी-चोरी चुपके चुपके’, ‘दिल चाहता है’, ‘कोई मिल गया’, ‘कल हो ना हो’, ‘फर्ज’, ‘वीर जारा’, ‘सलाम नमस्ते’, ‘कभी अलविदा ना कहना’ आणि ‘दिल है तुम्हारा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.