बॉलिवूडमध्ये २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला विनोदी चित्रपट ‘फुकरे’ खूप गाजला. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अपेक्षित असलेलं सर्व काही या चित्रपटात होतं असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच वेळी याच्या सिक्वलची घोषणा केली होती. एक्सेल एण्टरटेनमेंट बॅनरखाली निर्मिती होणाऱ्या ‘फुकरे रिटर्न्स’ या चित्रपटाचे पोस्टर्स नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘उम्मीद पे नहीं, जुगाड पे दुनिया कायम है,’ असं या पोस्टरवर लिहिलेलं आहे. यामध्ये सर्व कलाकारांचे चेहरे लपलेले आहेत. एक्सेल एण्टरटेनमेंटने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा पोस्टर शेअर केलाय.
तर ‘जहां फुकरे, वहां भोली’ या कॅप्शनसह चित्रपटाचा दुसरा पोस्टर प्रदर्शित झालाय. लवकरच टीझरदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं या ट्विटमध्ये म्हटलंय. पहिल्या भागात दाखवल्या गेलेल्या कथेलाच सिक्वलमध्ये पुढे नेण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. यामध्ये पुल्कित सम्राट, अली फजल, मनजोत सिंग आणि वरुण शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर अभिनेत्री रिचा चड्डा पंजाबी तरुणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मृगदीप सिंग दिग्दर्शित हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी ‘फुकरे रिटर्न्स’च्या शूटिंगची सुरुवात झाली होती.
Jahaan Fukrey, wahaan Bholi. #FukreyReturnsTeaserTomorrow!
जहां फुकरे, वहां भोली। @excelmovies pic.twitter.com/ZOgsvadyVG
— Fukrey 3 (@Fukr3y) August 8, 2017
The jugaadu boys are back! Stay tuned for #FukreyReturns @fukreyreturns pic.twitter.com/UsrBsO4Ipm
— Excel Entertainment (@excelmovies) August 7, 2017
PHOTOS : सैफीनाचा चिमुकला तैमुर वेधतोय नेटीझन्सचं लक्ष
कोणताही मोठा चेहरा नसतानाही ‘फुकरे’ चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आता ‘फुकरे रिटर्न्स’ प्रेक्षकांना तितकाच आवडतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.