शास्त्रीय आणि उपशास्त्रीय या दोन्ही गानप्रकारात समर्थपणे विहार करणारे देवकी पंडित आणि राहुल देशपांडे हे दोघे दिग्गज गायक ‘भाई कोतवाल’ या चित्रपटात प्रथमच एकत्र येत आहेत. या दोघांचे हे गाणे चित्रपटाचे चित्रीकरणही सुरू होण्यापूर्वीच रिंगटोनच्या रूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ब्रिटिशांशी गनिमी काव्याने लढा देणारे स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवनावरील या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन एफ. एम. इलियास यांनी केले आहे. ‘हंगामा डॉट कॉम’च्या सहकार्याने हा प्रयोग करण्यात आला आहे.
चित्रपटातील ‘देई तुझे घाव, मुखी तुझे नाव, मनी एक भाव, रात्रंदिन..’ हे गाणे इब्राहिम अफगाण यांनी लिहिले असून ते राहुल देशपांडे व देवकी पंडित यांनी गायले आहे. या गाण्याच्या निमित्ताने शास्त्रीय संगीतातील दोन मोठे गायक पहिल्यांदा एकत्र आले आहेत. अमर मोहिले यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. वीर कोतवाल फाऊंडेशनतर्फे शशिकांत चव्हाण यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची पटकथा एफ. एम. इलियास आणि इब्राहिम अफगाण यांची आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jul 2014 रोजी प्रकाशित
राहुल देशपांडे, देवकी पंडित प्रथमच एकत्र
शास्त्रीय आणि उपशास्त्रीय या दोन्ही गानप्रकारात समर्थपणे विहार करणारे देवकी पंडित आणि राहुल देशपांडे हे दोघे दिग्गज गायक ‘भाई कोतवाल’ या चित्रपटात प्रथमच एकत्र येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 09-07-2014 at 07:24 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul deshpande devaki pandit will share stage first time together