बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या ‘बेफिक्रे’ या आपल्या आगामी चित्रपटासाठी जीममध्ये भरपूर घाम गाळत आहे. ‘बेफिक्रे’चे सध्या पॅरिसमध्ये चित्रीकरण सुरू असून रणवीर जीम प्रशिक्षक लॉयड स्टीव्हन्स याच्या देखरेखीखाली व्यायाम करत आहे. नुकतेच स्टीव्हन्सने रणवीरसोबतचा एक फोटो ट्विटकरून रणवीरने जीममध्ये मेहनत घेऊन आपल्या शरीरयष्टीत लक्षवेधी बदल घडवून आणल्याचे म्हटले आहे.
आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘बेफिक्रे’ चित्रपटात रणवीर अभिनेत्री वाणी कपूर हिच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. सात वर्षांनंतर आदित्य चोप्रा दिग्दर्शनात पुनरागमन करणार आहे. याआधी आदित्यने शाहरुख आणि अनुष्का शर्मा यांच्या ‘रब ने बना दी जोडी’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranveer singh beefs up for befikre trainer lloyd stevens shares picture