कोकणाच्या पार्श्वभूमीवर चित्रीत झालेली, एकामागोमाग एक घडत जाणाऱ्या रहस्यमय घटनांचा माग घेताना कोकणातील सगळ्या प्रथा, अंधश्रद्धा यांचा आधार घेत रचलेली ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका पुन्हा एकदा सुरु झाली. कुठलंही प्रथितयश कलाकार नसतानाही या मालिकेतील व्यक्तिरेखा घराघरांत लोकप्रिय ठरल्या. ‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेत सरिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता वाडये अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मालिकेत साधीभोळी म्हणून वावरणाऱ्या प्राजक्ताचा अनोखा लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालिकेतील सरिताच्या भूमिकेसाठी प्राजक्ताने स्वत:चा मेकओव्हर केला आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असून फेसबुकवर तिने काही फोटो पोस्ट केले आहेत. मालिकेत नेहमीच पारंपारिक पेहरावात दिसणाऱ्या सरिताचे हे फोटो पाहून ही तीच आहे का असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. खऱ्या आयुष्यात प्राजक्ताला भारतीय कपड्यांसोबत पाश्चिमात्य कपडेही परिधान करायला आवडतात.

‘रात्रीस खेळ चाले २’ ही प्राजक्ताची दुसरी मालिका असून याआधी तिने झी युवा वाहिनीवरील ‘गर्ल्स हॉस्टेल’ या मालिकेत भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे तिने काही नाटकांमध्येही काम केलं आहे. प्राजक्ताने दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या ‘नदी वाहते’ या चित्रपटातही भूमिका साकारली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratris khel chale actress prajakta wadaye different look watch photos