दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कपल नागाचैतन्य आणि समांथा यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोट घेतल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. विभक्त झाल्यानंतर आता समांथाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समांथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने ८ ऑक्टोबर रोजी लॅकमे फॅशन वीकमध्ये दिसणार असल्याची माहिती दिली आहे. चाहत्यांनी समांथाच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. जवळपास १२ लाख पेक्षा जास्त लोकांनी हा फोटो लाइक केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत ‘आम्ही तुझ्या कायम पाठीशी आहोत’ असे म्हटले आहे. तर काही चाहत्यांनी तिच्या लूकची प्रशंसा केली आहे.

आणखी वाचा : चिटिंग करणारे…’, समांथाने घटस्फोट घेताच एक्स- बॉयफ्रेंड सिद्धार्थने केले ट्वीट

आणखी वाचा : घटस्फोट तर स्वर्गातच…’, समांथा-नागाचैतन्यच्या घटस्फोटानंतर राम गोपाल वर्माचे ट्वीट चर्चे

काय होती समांथा आणि नागाचैतन्यची पोस्ट?
“आमच्या सगळ्या हितचिंतकांसाठी, बराच विचार केल्यानंतर मी आणि चै(नागा चैतन्य)ने पती-पत्नीच्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १० वर्षांपासून आम्ही खूप चांगले मित्र-मैत्रिण आहोत आणि आमच्यात असलेले हे नात कायम राहिल. आम्ही आमच्या चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती करतो की या कठीण काळात ते आम्हाला पाठिंबा देतील आणि आम्हाला प्रायव्हसी द्याल. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद” या आशयाची पोस्ट त्यांनी केली होती.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, समांथा आणि नागा चैतन्य यांच्या वैवाहिक जीवनात फूट पडण्याचे कारण समांथाचे चित्रपट आणि करिअरवर असलेले तिचे प्रेम आहे. लग्नानंतरही समांथा चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे आणि ग्लॅमरस फोटोशूट करत राहते. पण पती नागा चैतन्य आणि तिचे सासरे नागार्जुन यांना हे आवडत नाही. दोघेही समांथाला तिचे मन बदलण्यासाठी आणि सासू अमला अक्किनेनीच्या पावलांवर पाऊल ठेवण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, ‘फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजमध्ये समांथाने बोल्ड भूमिका साकारली होती. त्याचा परिणाम हा नागाचैतन्य आणि तिच्या वैवाहिक जीवनावर झाला आहे. त्यामुळे ते विभक्त झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samantha shares first photo on instagram after separation with naga chaitanya avb