मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सने तयार केलेला आयर्नमॅन हा आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिरेखेंपैकी एक म्हणून ओळखला जातो. अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरने आपल्या अफलातून अभिनयाच्या जोरावर आयर्नमॅनला एका वेगळ्याच उंचीवर नेले. भारतातही या सुपरहिरोचे लाखो चाहते आहेत. त्यातीलच एका चाहत्याने चक्क आयर्नमॅनचा ‘आयर्नसुट’ तयार केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्यक्ति सुपरहिरो आयर्नमॅनचा जबरा फॅन आहे. त्याने आयर्नमॅनच्या आर्मर सारखा दिसणारा एक आयर्न सुट तयार केला आहे. या सुटमध्ये त्याने विविध प्रकारची हत्यारे जोडली आहेत. या सुटबाबत माहिती देणारा एक व्हिडीओ देखील त्याने तयार केला असुन या व्हिडीओला त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्याच्या मते भारत देशावर आक्रमण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी त्याने या आयर्नसुटची निर्मिती केली आहे. परंतु त्याच्या या अनोख्या प्रयोगाची नेटकऱ्यांनी मात्र खिल्ली उडवली आहे. आतापर्यंत चार लाखांपेक्षा अधिक लोकांनी या प्रयोगावर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.

अशा प्रकारे ट्रोल केले जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sasta tony stark this mans iron man inspired suit leaves netizens in splits mppg