जवळपास चार महिन्यांनंतर मालिका आणि रिअॅलिटी शोचं शूटिंग सुरू झाले आहेत. पण अजूनही करोना व्हायरसची टांगती तलवार कलाकारांवर कायम आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘सिंगिंग स्टार’ या रिअॅलिटी शोमधील चौघांना करोनाची लागण झाली. रोहित राऊत, जुईली जोगळेकर, अभिजीत केळकर आणि पूर्णिमा डे यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यापैकी रोहित आणि जुईली आता पूर्णपणे बरे झाले आहेत.
१७ ऑगस्ट रोजी रोहितचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला घरीच क्वारंटाइन करण्यात आलं. जुईलीसुद्धा घरीच क्वारंटाइनमध्ये होती. या दोघांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट लिहित करोनावर मात केल्याची माहिती चाहत्यांना दिली. सुरक्षेच्या खातर या रिअॅलिटी शोचं शूटिंग १० सप्टेंबरपर्यंत थांबवण्यात आलं आहे.
आणखी वाचा : ‘ती माझ्या मिठीत आहे’; ऐश्वर्याबद्दल विवेकचे असे वक्तव्य ऐकताच भडकला होता सलमान
मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावेलाही करोनाची लागण झाली आहे. सुबोधसोबतच त्याची पत्नी मंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.