आजकाल, अनेक कलाकार काही ना काही नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी जर सोबतीला अनेक वर्षांचे अनुभव असेल तर पावलोपावली आपल्याला एक हिंमत आणि प्रेरणा मिळत असते. नवीन काही सुरु करु पाहणाऱ्या अनेक कलाकारांपैकी एक अशी मराठमोळी अभिनेत्री आहे जिने स्वत:च्या टॅलेंटवर बॉलिवूडमध्येही एका पेक्षा एक बेस्ट परफॉर्मन्स दिले आहेत आणि ती अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत १८ वर्षे पूर्ण केली आहेत. मराठीमध्ये उत्तम अभिनय केल्यावर अमृताने हिंदी सिनेमांतही काम केले आहे. बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या मेघना गुलजार दिग्दर्शित आणि आलिया भटची प्रमुख भूमिका असलेल्या ‘राझी’ सिनेमात अमृताने ‘मुनिरा’ची भूमिका अतिशय सुंदर पध्दतीने साकारली. त्यानंतर अमृताने मिलाप झवेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते’ सिनेमात जॉन अब्राहम आणि मनोज बाजपेयी यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली. ‘नटरंग’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमांतून संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम मिळवणारी अमृता आता लवकरच एका नवीन प्लॅनेटवर दिसणार आहे.

नवीन प्लॅनेट म्हणजे नेमके काय असा प्रश्न अनेकांना पडणं अगदी साहजिक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत अमृता स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याच्या मार्गावर आहे. प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांच्या सहयोगाने अमृता मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला डोळ्यांसमोर ठेवून नवीन प्लॅन्स तयार करत आहे.’

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवर उत्तर देत अमृताने म्हटले की, ‘टॅलेंट हे कधीही लपून राहू शकत नाही ते कधी ना कधी बाहेर आणणे आवश्यक असते. लवकरच तुम्हांला माझ्याकडून त्याविषयी जाणून घ्यायला मिळेल’, असं म्हणत तिने प्रेक्षकांना कोड्यात नक्कीच पाडले आहे.

अमृता आता नवीन काय घेऊन येत आहे यासाठी अनेकजण उत्सुक असणार यात शंका नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Something pretty interesting is happening amruta khanvilkar on a new planet ssv