सनी लिओनीने बघता बघता मनोरंजन विश्वात आपलं वेगळे स्थान निर्माण केले. सुरुवातीला ‘पॉर्नपरी’ म्हणून ओळखली जाणारी ही अभिनेत्री आता ‘बेबी डॉल’ म्हणून प्रसिद्ध आहे. तिने पूजा भट्टच्या ‘जिस्म २’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले तरी तिला खरी ओळख एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस २’ चित्रपटानेच मिळाली. यातील तिचे ‘बेबी डॉल’ हे गाणे बरेच गाजले होते. तेव्हापासून एकता आणि सनीमध्ये मैत्री झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : Fat to Fab ‘चिडिया घर’ फेम अभिनेत्रीचा नवा लूक पाहून तुम्हीही व्हाल थक्क

सध्या एकता तिच्या आगामी ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ या वेब सीरिजच्या लाँचवर लक्ष देतेय. दरम्यान, कोणत्याही प्रकारे सनीने या वेब सीरिजमध्ये काम करावे, अशी तिची अपेक्षा होती. प्रसिद्धी कार्यक्रम किंवा पाहुणी कलाकार म्हणून का होईना, पण तिचे नाव वेब सीरिजशी जोडले जावे असे एकताला वाटत होते. मात्र, सनीने नकार दिल्यामुळे तिचे बॉलिवूड करिअर उभे करणारी एकता कपूर चांगलीच रागावली आहे.

सनीमुळे इव्हेंटमध्ये जरा ग्लॅमर येईल असा एकताचा विचार होता. पण सनीची काही वैयक्तिक कामं असल्यामुळे ती यावेळी तिच्या मैत्रिणीची मदत करू शकत नसल्याचे कळते. सनी नुकतीच लॉस एंजेलिसला गेली असून, तिथे ती स्वतःच्या निर्मितीसंस्थेवर काम करतेय. त्यामुळे ती दोन महिने व्यग्र असणार आहे.

वाचा : ‘पॉर्न स्टारला स्वीकारता, मग बलात्कार पीडितेला स्वीकारताना संकोच का?’

एकता जवळील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनीच्या निर्णयामुळे एकताला खूप त्रास झाला. ‘रागिनी एमएमएस २’ हा सनीच्या करिअरमधील महत्त्वाकांक्षी चित्रपट होता. एकताबद्दल असलेल्या निष्ठेप्रती तरी निदान तिने स्वतःचे काम बाजूला ठेवायला हवे होते.
दुसरीकडे सनीच्या बाजूने काही वेगळीच माहिती देण्यात आली. ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ची प्रसिद्धी करण्यात सनीला खूप आनंद झाला असता. पण, दुर्दैवाने त्यावेळी तिच्याकडे तारखा उपलब्ध नाहीत. एकताच्या टीमने तिची गैरसोय समजून घेतली असून, त्या दोघींमध्ये कोणताही वाद नाही, असे सनीच्या टीमकडून सांगण्यात आलेय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone has upset ekta kapoor