छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील बबिता आणि जेठालाल या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. जेठालाल हे पात्र अभिनेते दिलीप जोशी साकारत आहेत तर बबिता हे पात्र अभिनेत्री मुनमुन दत्ताने साकारले आहे. नुकताच मुनमुन दत्ताने तिचा वाढदिवस साजरा केला. पण तिने जेढालाल नाही तर दुसऱ्या एका खास व्यक्तीसोबत वाढदिवस साजरा केला आहे. ती व्यक्ती कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुनमुनने वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटो आणि व्हिडीओंवर चाहते आणि सेलिब्रिटी कमेंट करताना दिसत आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मुनमुन ही आई आणि तिच्या मांजरीसोबत वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील बबीताचे होते या’ बॉलिवूड अभिनेत्यावर प्रेम

दरम्यान मुनमुनने काळ्या रंगाचा वनपिस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. मुनमुनचे आईसोबत वाढदिवस साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. हे फोटो शेअर करत मुनमुनने छान असे कॅप्शन दिले आहे.

मुनमुनच्या या पोस्टवर डेलनाज ईराणीने कमेंट करत ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे म्हटले आहे. तसेच तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत अंजली भाभीची भूमिका साकारणाऱ्या सुनैना फौजदारने कमेंट करत ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा, अशीच हसत रहा आणि आनंदी रहा’ असे म्हटले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah actress munmun dutta celebrates her birthday with this person avb