‘सीआयडी’ ही एकेकाळची लोकप्रिय मालिका होती. या मालिकेतील पात्रांची नावं व कलाकार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मालिकेचे जुने भाग अनेक प्रेक्षक आजही बघतात. या मालिकेतील इन्स्पेक्टर फ्रेडरिक्स हे पात्र दिनेश फडणीस यांनी साकारलं होतं. दिनेश यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, असं म्हटलं जात होतं. पण आता दया म्हणजेच दयानंद शेट्टीने ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दयानंद शेट्टी म्हणाले, “दिनेश फडणीस हॉस्पिटलमध्ये दाखल असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत, ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही, त्याच्यावर दुसऱ्या आजारासंदर्भात उपचार सुरू आहेत. यावर मी आत्ताच भाष्य करू इच्छित नाही.”

दिनेश फडणीस यांना मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. १ डिसेंबरपासून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला नाही, दुसऱ्या आजारासंदर्भात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची रविवारीही तुफान क्रेझ; तिसऱ्या दिवशी केली सर्वाधिक कमाई, एकूण कलेक्शन ‘इतके’ कोटी

दरम्यान, दिनेश फडणीस यांची प्रकृती खालावल्याचं कळताच ‘सीआयडी’ मालिकेतील सर्व कलाकारांनी रुग्णालयात त्यांची भेट घेतली होती. दिवसेंदिवस त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं कळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cid fame dayanand shetty gave dinesh phadnis health update hrc