अभिनेत्री देबिना बॅनर्जी ही मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गुरमीत चौधरीसह विवाहबंधनात अडकल्यानंतर ११ नोव्हेंबरला ते दोघेजण दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. देबिनाला अकरा वर्षांनी एप्रिल २०२२ मध्ये त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. त्यानंतर लगेचच ११ नोव्हेंबर २०२२ ला देबिना दुसऱ्यांदा आई झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी आता त्या दोघांनी तिच्या नावाची घोषणा केली आहे.
गुरमीत चौधरीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या लेकीबरोबरच्या खास फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत देबिना आणि गुरमीत एका समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळत आहेत. ते दोघेही त्यांच्या लेकीला खेळवताना दिसत आहेत. या फोटोवर त्यांनी तिचे नावही लिहिले आहे.
आणखी वाचा : “मेघा धाडेची ती पोस्ट म्हणजे…” आस्ताद काळे स्पष्टच बोलला
गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांच्या दुसऱ्या लेकीचे नाव दिविशा असे आहे. या फोटोला कॅप्शन देताना गुरमीत म्हणाला, “आमच्या लेकीचे नाव दिविशा असे आहे. सर्व देवींची प्रमुख आणि दुर्गेचे रुप असा या नावाचा अर्थ होतो.”
दरम्यान गुरमीत चौधरी व देबिना बॅनर्जी मालिका विश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. २०११ साली विवाहबंधनात अडकत त्यांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर तब्बल ११ वर्षांनी देबिना व गुरमीतच्या आयुष्यात चिमुकलीचं आगमन झालं. दरम्यान देबिनाने एप्रिल २०२२मध्ये पहिल्या मुलीला जन्म दिला. तिचे नाव लियाना असे आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ती पुन्हा आई झाली होती.