टेलिव्हिजन विश्वात ‘मोस्ट कॉन्ट्रोव्हर्शिअल शो’ असा नुसता उल्लेख केला तरीही एका कार्यक्रमाचे नाव अनेकांच्याच तोंडी येते ते म्हणजे ‘बिग बॉस’चे. सेलिब्रिटींना काही दिवसांसाठी एका घरात कोणत्याही ऐश्वारामाशिवाय एकत्र ठेवत या कार्यक्रमाला तडका दिला जातो. यामध्ये साथ मिळते ती कार्यक्रमातील धमाल टास्क आणि सलमान खानच्या खुसखुशीत सूत्रसंचालनाची. अशा या बहुप्रतिक्षित रिअॅलिटी शोच्या ११ व्या पर्वाला लवकरच सुरुवात होईल. नव्या पर्वात बिग बॉसच्या घरात सर्वसामान्य व्यक्ती आणि सेलिब्रिटी अशी धमाल पुन्हा एकदा पाहता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : अभिषेकचा ‘या’ बहुचर्चित चित्रपटातून काढता पाय!

‘बिग बॉस’च्या या वादग्रस्त घरात नेमके कोणकोणते सेलिब्रिटी दिसणार हे जाणून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय. अनेकांनी तर बऱ्याच सेलिब्रिटींच्या नावांविषयीचे तर्कवितर्क लावण्यासही सुरुवात केली. दरम्यान, प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणण्यासाठी बिग बॉसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर दोन स्पर्धकांचे टिझर शेअर करण्यात आले होते. यामध्ये एका महिलेचा आणि एका पुरुषाचा फोटो शेअर करण्यात आलेला. मात्र, दोघांचीही पूर्ण झलक दाखवण्यात आली नव्हती. त्या हलक्याशा झलकवरून या स्पर्धकांना ओळखा असे कोडे बिग बॉसने सर्वांना घातले होते.

हे दोन स्पर्धक नक्की आहेत तरी कोण हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली असेल. तर या स्पर्धकांमधील पहिली स्पर्धक टर्किश मॉडेल हलिमा मतलुब असून, भारतातील युट्यूब सेन्सेशन असलेला हर्ष बेनिवाल हा दुसरा स्पर्धक असेल. १ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस ११’ ला सुरुवात होईल.

वाचा : सिने‘नॉलेज’ आमिरने ‘रंग दे बसंती’मध्ये साकारलेल्या भूमिकेचे नाव काय?

दरम्यान, ‘बिग बॉस’चे यावेळेचे घर हे आधीपेक्षाही मोठे असणार आहे. सेलिब्रिटी आणि सामान्य स्पर्धक एकत्र घरात राहणार असले तरी घराचे दोन भाग करण्यात येणार आहेत. प्रत्येक ग्रुपला सुरक्षित राहण्यासाठी वेगवेगळे टास्क करावे लागणार आहेत. टास्क पूर्ण करणाऱ्यांना अतिरिक्त गुण देण्यात येतील.

https://twitter.com/Chhota_Bhim/status/909861911931453440

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These 2 celebrities are a part of salman khans bigg boss